पाथरी:-तालुक्यातील वाघाळा शिवारात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याने ग्रामस्थात भितिचे वातावरण पसरले असून वनपाल यांनी भेट देऊन ठश्यांची पहाणी करून सदरील ठसे बिबट्याचे असल्याचे सांगुन किमान आठ दिवस ग्रामस्थांनी सतर्क राहाण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजन्याच्या सुमारास शेख आब्बास शेख बाबामियाँ यांना शेतातून घरी येत असतांना ऊसाच्या शेताच्या बांधावर प्राणी उभा असल्याचे दिसले निरखुन पाहिले असता तो वाघ असल्याचे त्यांच्या लक्षात अल्याने ते घाबरले इतरांना हाका मारल्या या वेळी बिबट्या उसाच्या शेतात शिरल्याचे ते सांगतात त्या नंतर ही माहिती ग्रामस्थांना कळताच गावात भितीचे वातावरण पसरले.
सद्य स्थितीत खरीपाच्या पिकांची मशागतीची कामे सुरू असून ग्रामस्थ लहान थोरां सह शेती कामात मग्न असून बिबट्या आला असल्याची माहिती मिळाल्याने सोमवारी बहुतांशी शिवार मानसा अभावी सुने सुने झाले होते या विषयीची माहिती आणि पावलांचे ठसे सरपंच बंटी पाटील यांनी वनपाल विठ्ठल बुचाले यांना पाठवले वनपाल सायंकाळी वाघाळा गावात आले आणि त्यांनी सरपंच बंटी पाटील,प्पत्यक्ष दर्शी शेख आणि ग्रामस्थां सह स्थळ पहाणी करून सबंधित पाऊल खुना या बिबट्याच्या असल्याचे सागून ग्रामस्थांनी आठ दिवस सतर्क राहाण्याचे आवाहन करून या साठी एकट्या ने शेतात जाणे टाळावे. घुंगरू बांधलेली काठी हातात ठेवावी,गळात रुमाल बांधावा,आखाड्यावर प्रकाश ठेवावा.एकट्याने झोपु नये,लाकूट पेटलेले ठेवावे असे काही उपाय सांगून बिबट्या आल्या मार्गाने परत जाईल त्या मुळे किमान आठ दिवस सतर्कता राखावी असे आवाहन केले आहे.