चांगले विचार आणि संस्कार प्राप्त करण्यासाठी ग्रंथ वाचन संस्कार जपणं गरजेचे–शरद कुलकर्णी

 

सेलू / प्रतिनिधी – विद्यार्थी जीवनात शालेय शिक्षण महत्त्वाचं असतं.परंतु बाह्य संस्कार, संस्कृती हे अंगिकारण्यासाठी ग्रंथ मित्र जोडणे आवश्यक. चांगले विचार आणि सुसंस्कृतपणा, आचरण हे ग्रंथातुन वाचायला मिळतात आणि म्हणून ग्रंथांशी मैत्री करणं गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात समृद्ध व्यक्तिमत्त्व प्राप्त करण्यासाठी वाचन संस्कार संपादन करताना वेळेचं नियोजन करणं आवश्यक वाटतं.

 

यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणि श्रमप्रतिष्ठा याला प्राधान्यक्रम देणं महत्त्वाचं. चांगले व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक प्रतिष्ठा चांगला माणूस म्हणून जगताना आपलं वेगळेपण दिसण्यासाठी वाचन संस्कार जपणं गरजेचे . असं प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने केशवराज बाबासाहेब विद्यालयात आयोजन दिनांक: २१ जानेवारी, मंगळवार रोजी करण्यात आले होते.ग्रंथ विद्यार्थ्यांच्या हाती या उपक्रमांतर्गत प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी बोलत होते. संस्थेचे सचिव महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर, यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.

 

व्यासपीठावर संस्थेचे सचिव महेश वसंतराव खारकर, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, चंद्रशेखर मुळावेकर, संजय विटेकर, मुख्याध्यापक एडके,हळणे, इत्यादी. प्रारंभी केशवराज बाबासाहेब माध्यमिक विद्यालय वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एडके , सुत्रसंचलन जयश्री सोन्नेकर, आभार सुरेश मारेवाड, यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्का धर्माधिकारी,अमिता जवळेकर, किशोर खारकर, योगेश ढवारे, अनिरुद्ध टाके विठ्ठल काळे, अण्णासाहेब गायकवाड, इत्यादींनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment