संजय गणपतरावं मगर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

 सेलू / नारायण पाटील – सेलू येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शहर शाखेचे शाखा व्यवस्थापक संजय गणपतराव मगर हे आज त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत.

 

त्यांच्या या सेवानिवृत्ती बद्दल व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक वर्गा च्या वतीने सत्कार करण्यात आला .येथील नूतन विद्यालयात आयोजित या सत्कार सोहळ्यात नूतन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, नारायण सोळंके, डी.डी. सोन्नेकर, गणेश माळवे, परशुराम कपाटे, किशोर कटारे, प्रशांत नाईक, वीरेंद्र धापसे, सुनील तोडकर, राजेंद्र सोनवणे,अनंतकुमार विश्वंभर,कृष्णा रोडगे,प्रसाद कायंदे, केशव डहाळे आदींची उपस्थिती होती.

 

 

संजय मगर यांनी १९९० साली परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवेस प्रारंभ केला . व त्यांनी आतापर्यंत वालूर, धामणगाव आणि सेलू शहरात १९९४ पासून ते कार्यरत आहेत. त्यांच्या दिल खुलास स्वभावामुळे व तत्पर सेवेमुळे तसेच सहकार्य वृत्ती मुले ते सर्वच शाळेतील शिक्षकांशी मैत्रीपूर्ण नाते जपलेले आहे .
त्यांची एकूण 33 वर्षे सेवा झालेली आहे. आज त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सेलू तालुक्यातील शिक्षकाकडून त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Comments (0)
Add Comment