जलदिनाच्या निमित्ताने दुधना धरण येथे जलपूजन व जलप्रतिज्ञा

मोरया प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

सेलू, प्रतिनिधी – जलदिनाच्या निमित्ताने येथील मोरया प्रतिष्ठान च्या वतीने निम्न दूधना प्रकल्प येथे जलपूजन- जलप्रतिज्ञा घेत मान्यवरांच्या हस्ते जनजागृती भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

या उपक्रमासाठी झरी ता.जि.परभणी येथील नाम फाउंडेशनचे सदस्य आणि महाराष्ट्र कृषिभूषण पुरस्कार प्राप्त मा.श्री कांतराव देशमुख झरीकर, पाटबंधारे उपविभागाचे निवृत्त अभियंता मा.श्री कांतराव सोळंके साहेब, अभियंता मा.श्री बागले साहेब,मा.श्री शिवणारायनजी मालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी पाणीसाठ्याचे जलपूजन, जलप्रतिज्ञा व भीतीपत्रकाचे अनावरन करण्यात आले.

तसेच पाणी पुरवठा कर्मचारी मलिकार्जुन स्वामी,मोरोती चव्हाण,शेख मोईन देवीलाल अंभुरे यांचा तसेच शहरात घरोघर फिरून पुनर्भरणाचे महत्व पटवून देणारे जेष्ठ जलदूत मित्र शिवनारायन मालानी यांचा देखील प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सेलू येथील अरिहंत गॅस एजन्सीचे संचालक रोहितजी काला यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून उपक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभिजित राजूरकर यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचा संक्षिप्त आढावा सांगितला तर पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री बागले यांनी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याची आणि झपाट्याने कमी होणाऱ्या जलपातळीची गंभीर परिस्थिती विषद केली.

श्री कांतराव देशमुख झरीकर यांनी नाम फाऊंडेशनचे कार्य सांगत झरी येथील श्रमदानातून केलेल्या विविध जल व्यवस्थापनाची माहिती देत नागरिकांनी स्वतः पाण्याविषयी जागरूक होत बँकेतल्या जमा पैशाचे जसे नियोजन आपण करतो तसेच लोअर दुधना धरणात असलेल्या पाणी साठ्याचे नियोजन करावे असे आवाहन केले

सेलू पासून अंदाजे १५ किमी अंतरावर असलेल्या प्रकल्प ठिकाणी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मान्यवरांचे, पाटबंधारे विभागातील अधिकारी -कर्मचारी वर्गाचे, जागरूक महिला भगिनींचे, मोरया जलदूत मित्र आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या मोरया प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात आले

Comments (0)
Add Comment