सेलू / प्रतिनिधी – सार्वजनिक गणेशउत्सवाच्या गणपती मिरवणूक व विसर्जनाचे अनुषंगाने सेलू शहरातील गणेश विसर्जन मार्ग तसेच विसर्जन स्थळाची संपूर्ण पाहणी पोलीस प्रशासन व न प प्रशासनाच्या वतीने आज करण्यात आली .
मिरवणुकीतील अडीअडचणी व येणाऱ्या समस्या याचे अनुषंगाने झालेल्या तयारी बाबत सर्वांशी चर्चा केली. यावेळी शहरांमधील सर्व गणपती हे बाजार समितीच्या आवारातील विहिरीमध्ये विसर्जन होणार असल्याने त्या ठिकाणची सुद्धा पाहणी करण्यात आली . नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.. नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन विसर्जन मिरवणूक बंदोबस्त कामी सज्ज आहे.. पोलीस प्रशासनाच्या वतीने लागणाऱ्या तयारीसाठी सर्वांना पत्र व्यवहार करून आज रोजी चर्चा केली आहे..
यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे ,मुख्याधिकारी देविदास जाधव ,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या सह पोलीस अधिकारी ,कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते . तसेच वीज वितरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .
सेलू शहरातील आपल्या बाप्पाचे विसर्जन बाजार समितीच्या आवारातील नगरपालिका सेलू यांनी व्यवस्था केलेल्या विहिरीमध्ये करावे.असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना करण्यात आले आहे .