काकासाहेबनगर इंग्लिश स्कुल जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम

रामभाऊ आवारे निफाड
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षा आतील टेनिस क्रिकेट अजिंक्य स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये निफाड येथील के. के. वाघ इंग्लिश स्कूल ने प्रथम क्रमांक व मुलींचा संघ उपविजेता झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे, विलास गिरी व क्रीडा शिक्षिका योगिता महाजन व प्रतिक्षा कोटकर इत्यादी उपस्थित होते. नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल नियम व माहिती सांगितली. जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना के .के. वाघ इंग्लिश स्कूल व क्रीडा सह्याद्री यांच्यात होऊन के. के. वाघ ने एक गुणांनी हा सामना आपल्या खिशात टाकला. क्रीडा सह्याद्री संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करत उपविजेता ठरला. के.के.वाघ इंग्लिश स्कूल संघाचा कर्णधार हार्दिक जगझाप, संस्कार चव्हाण, प्रसाद जोगदंड, वेदांत शिंदे, गौरव वाकचौरे, अथर्व शिंदे, नैतिक पठाडे, हर्षवर्धन गारे, ऋग्वेद जाधव, ऋग्वेद चव्हाण, अभय कुशारे, आदित्य देवरे, आदित्य पाटील, तनिष्क कातकाडे, सार्थक जाधव, ऋषिकेश कोल्हे, प्रथमेश गंभीरे, विराज जाधव, श्रेयश शिंदे, प्राची कुशारे, तनुजा जाधव, श्रेया पानगव्हाणे, तनुजा रायते, सृष्टी वाघ, आराध्या जाधव, वैष्णवी गोसावी या सर्व खेळाडूंनी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला व अभय कुशारे, आदित्य पाटील व तनिष्क कातकाडे यांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. समीर दादा वाघ, विश्वस्त शकुंतलाताई वाघ,संस्थेचे जनसंपर्क संचालक श्री. अजिंक्य दादा वाघ, मुख्याध्यापक श्री. शरद कदम , शादाब शेख, संदीप शिंदे, राजेश लोखंडे, यशवंत पवार, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक भूषण निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments (0)
Add Comment