आणखी एका स्टारकिडला लाँच करणार करण जोहर

 

चित्रपट निर्माता करण जोहरने गुरुवारी अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरचा आगामी होम प्रोडक्शन चित्रपट ‘बेधडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची घोषणा केली. हा चित्रपट जोहरचा दीर्घकाळचा सहकारी शशांक खेतान यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

 

बॉलीवूड मध्ये निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेला करण जोहर अनेक स्टारकिड्स ना लाँच करण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. दबंग सल्लू भय्याप्रमाणे करण यानेही अनेक स्टारकिड्सना बॉलीवूड डेब्यूची संधी दिली आणि त्यातील काही आज टॉपवर आहेत. याच करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी चित्रपटातील कॅरेक्टर्सचे एक पोस्टर शेअर केले आहे. आणि त्यातून तो लवकरच आणखी एका स्टारकिड ला लाँच करत असल्याचे संकेत दिले आहेत.

ट्विटर पोस्टमध्ये, जोहरच्या बॅनर धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या नवीन चित्रपटाच्या कास्टिंगची घोषणा केली, ज्यामध्ये आगामी अभिनेते लक्ष्य लालवानी आणि गुरफतेह पिरजादा देखील आहेत.

पूर्वी, जोहरने आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्यासह अनेक नवोदित कलाकारांना लॉन्च केले आहे. लवकरच आणखी एका स्टारकिड ला लाँच करत असल्याचे संकेत दिले आहेत.

ही स्टारकिड कपूर खानदानातील आहे आणि अगोदरच ही यंग ब्युटी तिच्या ऑसम फॅशन सेन्स मुळे पॉप्युलर आहे. अनेक बॉलीवूड पार्ट्या मध्ये तिचा ग्लॅमरस लुक चर्चेचा ठरला आहे. या यंग ब्युटीचे नाव आहे शनाया कपूर. जान्हवी कपूर, अर्जुन कपूरची ही चुलत बहिण अभिनेता संजय कपूर यांची मुलगी आहे. बेधडक फोटो शूट साठी ती नेहमीच चर्चेत राहिली असून २२ वर्षीय शनायाचे बिकिनी मधील फोटो शूट खूप व्हायरल झाले होते. करन जोहरच्या ‘बेधडक’ मधून ती बॉलीवूड मध्ये डेब्यू करत आहे.

bedhadak moviebollywoodfilmy gossipshanaya kapoor
Comments (0)
Add Comment