सेलू ( प्रतिनिधी )
येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू व गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या वतीने मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी परभणी गजानन वाघमारे, गटविकास अधिकारी अमित कुमार मुंढे,केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,मायदेवी गायकवाड, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघांचे तालुकाध्यक्ष अमोल निकम आदी ची उपस्थिती होती
या वेळी रोख रक्कम दोन लाख,मुख्याध्यापक व प्रत्येक शिक्षकास सन्मान पत्र,शाळेस सन्मान चिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते.
या प्रसंगी माजी मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, नूतन मुख्याध्यापक संजय धारासुरकर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, जेष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, नरेश पाटील,कृष्णा पांचाळ, योगेश ढवारे,मंगेश कुलकर्णी सर्जेराव सोळंके, मुरलीधर खरात, नामदेव क्षीरसागर यांचा सन्मान करण्यात आला.