(प्रतिनिधी) :-
महाराष्ट्राचा पारंपारिक सण म्हणजे गणेशोत्सव. त्या निमित्त गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाडक्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहाने करण्यात आली. लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली मूर्ती पाहून कर्मचारी आनंदले होते. तसेच आकर्षक सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राणप्रतिष्ठा झालेल्या गणपतीची चैतन्यमय वातावरणात स्थापना पूजा जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे यांच्या हस्ते झाली.
पुरातन काळापासून अगदी १८९४ पासून सार्वजनिक गणेशोस्तव साजरा करण्यास सुरूवात झाली. लोकांमधील भेदभाव नष्ट व्हावे आणि सर्वांमधील आत्मविश्वास, एकीची भावना, राष्ट्रप्रेम वाढावे व स्वराज्य निर्मितीसाठी युवकांचे संघटीकरण व्हावे हे सार्वजनिक गणेशोस्तव सुरू करण्या पाठीमागचे उद्दिष्ट होते. हे सर्व उद्दिष्ट आपण अंगिकारले पाहिजेत, असे स्पष्ट मत जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वीय सहाय्यक कवी विठ्ठल सातपुते, बाळासाहेब पवार, प्रभाकर सातपुते, गोपी नेजे, प्रदीप गायकवाड, श्रीमती दुर्गा चव्हाण, श्रीमती काजल गायकवाड, अभिजीत चक्के, गणेश मिजगर, अश्विन कदम, दुर्गेश वाघ, शिवशंकर मुंढे, सिध्देश्वर फड, ऋषिकेश बनवसकर, वैभव मुंढे, जयदीप राठोड, गोविंद टरपले, प्रदीप कचवे, बालाजी मुंढे, श्रीहरी केंद्रे, गोविंद आव्हाड, कु.प्रताप पवार, कु.संस्कार सातपुते, कु.भावना पवार, कु.शिवराय सातपुते यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.