जास्त वाचनाने जगणे सुंदर होते- माधव गव्हाणे

 

सेलू / प्रतिनिधी – माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक असते. व ते परिवर्तन पुस्तकांच्या वाचनातून होते. खूप वाचले तर जगणे सुंदर होते. असे प्रतिपादन कवी माधव गव्हाणे यांनी केले. 

 

शहरातील नूतन विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन शुक्रवार ( दि. १८) रोजी प्रशालेचा मराठी विभाग, ग्रंथालय व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते. तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांची उपस्थिती होती. 

 

 

पुढे बोलताना माधव गव्हाणे म्हणाले की, ‘ विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा. आपले निश्चित ध्येय ठरवून वाटचाल करावी. जीवनात संयम, जिद्द, विश्वास, श्रध्दा असावी. ‘ असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची भुमिका मराठी विभाग प्रमुख डॉ. सुरेश हिवाळे यांनी विषद केली. प्रास्ताविक ग्रंथपाल अंजली देशपांडे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन गोपाळ आम्ले यांनी केले. वर्षा कदम, रामेश्वर पवार, अरूण रामपुरकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

Comments (0)
Add Comment