जेष्ठ नागरिक तिकिटांचा पुरवठा नसल्याने पाथरी डेपोचे दररोज एक लाखाचे नुकसान

 

सेलू,दि २७ (प्रतिनिधी)
शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी बस प्रवासात ५०% सवलत दिली आहे .व त्याची परिवहन मंडळाला सरकार भरपाई करून देते .परंतु त्यासाठी जेष्ठ नागरिकांना प्रवासात देण्यासाठी स्वतंत्र वेगळे बस तिकीट आहेत .व जेवढी अशी तिकिटे प्रवाशांना दिली जातात त्याचा हिशोब सादर केल्यानंतर परिवहन महामंडळाच्या ती रक्कम शासनाच्या वतीने प्राप्त होते .त्यामुळे साहजिकच महामंडळाचे नुकसान होत नाही .परंतु अशा तिकिटांचा पुरवठाच गेल्या चार ते पाच महिन्यापासून बंद असल्याने महामंडळाचे पाथरी आगाराचे दररोज अंदाजे एक लाखाचे नुकसान होत आहे .म्हणजे आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे .

बस प्रवासात वाहकाकडे प्रवाशांना तिकीट देण्यासाठी मशीन देण्यात आल्या आहेत .परंतु बहुतांशी मशीन बंद असल्याने पुन्हा वाहकांना तिकीतच पंचीग करूनच तिकीट फाडावे लागत आहेत .व त्यात अशी जेष्ठ नागरीकासाठीच्या तिकिटांचा पुरवठाच बंद असल्याने वाहक नाईलाजास्तव सर्वसामान्यांना देण्यात येणारच त्या किंमतीचे तिकीट जेष्ठ नागरिकांना देत आहेत .व त्याचे विवरण शासनाकडे पाठवता येत नसल्यामुळे महामंडळाचे प्रचंड नुकसान होत आहे .
तसेच ७५ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत प्रवास सवलत जाहीर केली आहे .व यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रवासाची किंमत शासन महामंडळाला अदा करणार आहे .परंतु त्यासाठी वाहकांना प्रवास करणाऱ्या व्यक्तीचे नावं ,आधारकार्ड किंवा मतदान कार्ड नंबर व कोठून कुठे प्रवास केला याची नोंद घ्यावी लागणार आहे .वाहक मंडळींना ही डोकेदुखी ठरणार असून ते यामध्ये हलगर्जीपणा करणार हे नक्कीच आहे .त्यामुळे देखील पर्यायाने महामंडळाचे नुकसानच होणार आहे .एकंदरीत वरिष्ठ मंडळींनी या प्रकरणी लक्ष घालून महामंडळाचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .

Comments (0)
Add Comment