महाराष्ट्रात महायुती सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत महिलांना १५०० रुपये मिळाले. आता पुढचा हफ्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे.
महायुतीचं सरकार असताना ही योजना लागू केली गेली होती. आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. या सरकारने महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. आता राज्यातील महिला पुढील हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मात्र लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे, लाडकी बहिणीच्या फॉर्मची फेरपडताळणी केली जाणार आहे. ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले जातील.आतापर्यंत ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते. त्यांना या योजनेचा लाभ घेता येत होता. मात्र आता या फॉर्मची पडताळणी केली जाणार आहे. ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होतील, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासह तुमच्याकडेही खाली दिलेल्या ६ गोष्टी असतील, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. कोणत्या आहेत त्या ६ गोष्टी? जाणून घ्या.
तुमच्याकडे या ६ गोष्टी आहेत का?
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ज्या महिलांनी भरला आहे, त्यांच्याकडे जर ४ चाकी वाहन असेल, तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. याला ट्रॅक्टर अपवाद आहे.
यासह ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक असेल , अशा महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
ज्या महिला आणि कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात, अशा महिलांना देखील या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे.
ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी पद्धतीने सरकारी विभागात काम करत असतील, अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
ज्या महिला शासनाच्या इतर भागातील योजना द्वारे लाभ घेत असतील,अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
ज्या महिलांच्या कुटुंबातील सदल्य माजी आमदार, खासदार आहेत. अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.