आग्र्यातील तीन बूट व्यापाऱ्यांवर प्राप्ति कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या छाप्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्या की, शेवटी नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली. रात्रभर नोटांची मोजणी सुरूच राहिली. आतापर्यंत या कारवाईत 50 कोटी जप्त करण्यात आले आहेत.
देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. या काळात रोख रक्कम सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही काळात, देशाच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अशाच एका कारवाईत प्राप्ति कर विभागाला तब्बल 50 कोटी सापडले आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम बुटांचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याकडे सापडली आहे.
त्तर प्रदेशातील आगरामध्ये पादत्राणांचा व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर आयकर विभागानं केलेली छोपेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 ते 55 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. असा अंदाज व्यक्त केला जातोय की, तिन्ही चप्पल व्यावसायिकांच्या घरातून जप्त करण्यात येणाऱ्या रोकडेचा आकडा 100 कोटींपर्यंत जाऊ शकतो. व्यावसायिकांच्या घरातील गाद्यांमध्ये, सोफ्यामध्येही रोकड लपवण्यात आली होती. सापडलेली रक्कम मोजण्यासाठी तब्बल अर्धा डझन मशीन सतत काम करत होत्या. पण नोटांची बंडलं काही संपण्याचं नाव घेईनात. दरम्यान, अद्याप आयकर विभागाची कारवाई सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यावसायिकांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे, त्यांची कंपनी मुख्यत्वे नकदी स्वरुपातच व्यवहार करते. विशेषतः छोटे विक्रेत्यांसोबत नकदी स्वरुपातील व्यवहार केला जातो. यासाठी कंपनीकडून बिलही दिलं जात होतं होतं. संपूर्ण व्यवहार ब्लॅकमध्ये केला जात होता. पावत्यांमार्फत हिशोब ठेवला जात होता.