आ.राजेश विटेकर यांच्या विजयासाठी महायुतीची वज्रमुठ

परभणी,दि 08 ः
पाथरी विधानसभेचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राजेश विटेकर यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्व नेते एकवटले असून प्रचार बैठकांंना पाथरी मानवत या तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आमदार राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वच महायुतीचे नेते कामाला लागले आहेत.आमदार राजेश विटेकर यांचा सोनपेठ बालेकिल्ला असला तरी त्यांची पाथरी,मानवत या तालुक्यावर विशेष पकड आहे.सोनपेठ तालुक्यात चंद्रकांत राठोड,दशरथ सुर्यवंशी,पाथरीत माजी आमदार आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते हरीभाऊ लहाने,पाथरीत सभापती अनिलराव नखाते,माजी सभापती दादासाहेब टेंगसे,मानवत शहरात माजी नगराध्यक्ष डॉ.अंकुश लाड, बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर,परभणी तालुक्यात भाजपाचे महामंत्री विलास बाबर,यांच्यासह अन्य नेते मंडळी झपाटून कामाला लागले आहेत. राजेश विटेकर यांनी शुक्रवारी  देवलगाव, पाळोदी आदी गावात भेटी दिल्या. यावेळी त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
प्रचाराचा धडाका सुरू झाल्याने आमदार विटेकर हे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत परभणी ग्रामीण, मानवत, पाथरी, सोनपेठ या तालुक्याच्या गावोगावी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. विविध गावात आमदार विटेकर यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे. त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते कार्यकर्ते हे सक्रीय आहेत. मानवत मधील अनेक जुने सहकारी देखील आमदार विटेकर यांच्यासोबत आले आहेत. प्रचार बैठकांच्या निमित्ताने महायुतीची एकजूट दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह सर्वच घटक पक्षाचे नेते पदाधिकारी निष्ठने काम करत आहेत. गावोगावी नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने आमदार विटेकर यांचे स्वागत होत आहे.

Comments (0)
Add Comment