जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू!

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 12 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. पंतप्रधान मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना तातडीने पहलगाम जाण्याचे आदेश दिले आहेत.
अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन घाटीच्या वरच्या भागात पर्यटक फिरत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे आणि ठिकाणे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यामागे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.महत्त्वाची बाब म्हणजे बैसरन येथे फक्त पायी जाता येते, हे एक अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. घटनेनंतर लगेचच, पोलिसांचे एक पथक लष्कर आणि निमलष्करी दलांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पर्यटकांना येथून काढले आणि हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.

नावं विचारून करण्यात घालण्यात आल्या गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, तमिळनाडू, उडिसा, महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर त्यांची नावं विचारून हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एक पर्यटक गंभीर जखमी आहे. तर इतर तीन पर्यटक जखमी आहेत. या सर्वांवर रुग्णालया उपचार केले जात आहेत.

या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, सीआरपीएफचे महासंचालक, जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक आणि लष्कराचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर अमित शाह यांनी दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही असे म्हटले. अमित शाह बीएसएफच्या खास हेलिकॉप्टरने श्रीनगरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत आयबी प्रमुख आणि गृहसचिव देखील आले आहेत. तिथे पोहोचल्यावरही अमित शाह हे एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी मोठा खुलासा केला आहे. दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील एका पर्यटन स्थळाला लक्ष्य करू शकतात अशी पूर्वसूचना होती. दहशतवादी धर्माच्या नावाखाली बिगर-काश्मिरींना लक्ष्य करू शकतात, अशी ही माहिती होती. त्या जागेची रेकी दहशतवाद्यांकडून आधीच करण्यात आली होती. जमिनीवरून मिळणाऱ्या मदतीमुळे दहशतवाद्यांना येथे शस्त्रे पोहोचवण्यात यश आले, असे सुरक्षा यंत्रणेचे म्हणणं आहे.

Comments (0)
Add Comment