बॉलिवूडमध्ये जेव्हा फॅशनची गोष्ट येते त्यावेळी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मलायका अरोराचं नाव घेतलं जात. आपल्या फॅशन आणि स्टाइलबाबत नेहमी जागरुक असणारी मलायका नेहमी इतरांपेक्षा काहीतरी क्लासी आणि हटके ट्राय करताना दिसते. मलायका तिच्या फिटनेस आणि फॅशनबाबतही नेहमी चर्चेत असते. मलायका बोल्ड, सेक्सी अंदाच अनेकांना घायाळ करतो. अशातच मलायकाने आता मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या नव्या मल्टी सेक्विन फॉरेस्ट ग्रीन साडीतील लूकने चाहत्यांना अधिकच घायाळ केले आहे.
बॉलिवूड चित्रपटांची प्रसिद्ध ‘आयटम गर्ल’ असलेल्या अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. या वयातही तिच्या फिटनेसनं चाहत्यांना वेड लावलं आहे. मलायकाने बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या साडीमध्ये द कपिल शर्मा शोमध्ये दिसली. ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती.
मलायकाने बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या साडीमध्ये द कपिल शर्मा शोमध्ये दिसली. ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती.
मलायकाची ही मल्टी सेक्विन फॉरेस्ट ग्रीन साडी तुम्ही देखील कॅरी करू शकता. या साडीमध्ये अनेक रंग, स्टेटमेंट प्रिंट्स आहेत.
या साडीमध्ये मल्टी-शेड सेल्फ सेक्विन एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. ज्यामुळे ही साडी आणखी सुंदर बनत आहे.