सेलू / प्रतिनिधी – मुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील राधे धामणगाव येथे घडली .
ज्ञानेश्वर नाथा गोरे यानी दिलेल्या खबरीवरून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशान्वये सेलू पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार जानगर करीत आहेत .
याबाबत हकीकत अशी की ,तालुक्यातील राधे धामणगाव येथील शिवकन्या सिद्धेवर गोरे ( २८) ही विवाहित महिला ही राधे धामणगाव शिवारातील गट न ,१२४ मध्ये मुगाच्या शेंगा काढणीसाठी गेली असता एम एस इ बी ची विजेच्या तुटून पडलेल्या तारेला स्पर्श झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे .
सदरील प्रकरणी आकस्मित मृत्यू क्रमांक ३८/२०२४ कलम १९४ भा .नागरिक सुरक्षा २०२३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे .