सेलू,दि 28 (प्रतिनिधी)ःजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय, सेलू आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास दि. 27/4/2022 रोजी परभणी जिल्हाक्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी भेट देऊन क्रीडा सुविधा बंदिस्त प्रेक्षागृहाची पाहणी केली.
या प्रसंगी नरेंद्र पवार म्हणाले खेळाडूंनी नियमितपणे खेळाचा सराव करावा, उन्हाळी प्रशिक्षण शिबीरा नंतरही खेळाडूंनी सातत्याने सराव करावा, आता कोरोना च्या नियंत्रामुळे मैदाने बहारले, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा फायदा घ्यावा. खेळाडूंनी खेळा सोबत अभ्यास करून आपले करीअर घडवावे.राज्य/राष्ट्रीय योगासन, टेनिसव्हॉलीबॉल, कबड्डी खेळाडू चा सत्कार करण्यात आला. व जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाल्या बदल पत्र देऊन देविदास सोन्नेकर यांचा सत्कार नरेंद्र पवार जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. एस.एम .लोया (अध्यक्ष नू.वि.शि.संस्था सेलू)
प्रमुख उपस्थितीत डी.के. देशपांडे (उपाध्यक्ष) डॉ. व्ही.के. कोठेकर (चिटणीस), जयप्रकाशजी बिहाणी (सहचिटणीस) संजय मुंढे (राज्य खो-खो मार्गदर्शक) रवी मुथा ( उद्योजक परभणी) मुख्याध्यापक नारायण सोळंके, एस.व्ही.पाटील, किरण देशपांडे, डी.डी.सोन्नेकर उपस्थित होते.
दि. 20 ते 30 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात 90 खेळाडूंनी सहभागी होऊन , व्हॉलीबॉल कबड्डी, योगासन, टेनिसव्हॉलीबॉल, मैदानी खेळ घेण्यात आले. प्रशिक्षक म्हणून क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, सतिश नावाडे, प्रंशात नाईक , सिध्दांत लिपने परीश्रम घेत आहेत.