आमदार संदीप क्षीरसागर यांचा वाल्मिक कराडचे नाव घेत थेट हल्लाबोल

: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आजही विधानसभेत गाजला. परभणी आणि बीडमधील मु्द्यावर सुरू असलेल्या चर्चेत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडचे नाव घेत थेट हल्लाबोल केला. संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील भयाण परिस्थिती सांगत कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य केले.

पोलिसांचे दुर्लक्ष भोवलं…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 6,9 आणि 11 डिसेंबर या महत्त्वाच्या तारखा आहेत. 6 तारखेला विंड मिलमध्ये भांडणं झाली. विंड मिल रॅकेटमुळे हा प्रकार घडला. 6 डिसेंबरला भांडणानंतर संतोष देशमुख आणि तिकडचा वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, केवळ एनसी घेतली. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली, असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. जेव्हा संतोष देशमुखला दोन गाड्या अडवून उचललं घेऊन गेले, तेव्हा त्यांच्यासोबत एक सहकारी होता. तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने सरपंचांचा जीव धोक्यात असल्याचे पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलिसांनी काहीच केलं नाही. दोन-तीन तासांनी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर पोलीस कामाला लागले असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.

: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आजही विधानसभेत गाजला. परभणी आणि बीडमधील मु्द्यावर सुरू असलेल्या चर्चेत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडचे नाव घेत थेट हल्लाबोल केला. संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील भयाण परिस्थिती सांगत कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य केले.

चॉकलेट खावं अशा पद्धतीने 307 चा गुन्हा दाखल होतोय…

संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत बीडमधील पोलिसांच्या कार्यशैलीवरही गंभीर आरोप केले. बीड जिल्ह्यात सध्याच्या घडीला वाळू, मटका आणि दारु अशा अवैध धंद्यांची भरमार आहे. जिल्ह्यात 307 चा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो. सरकारने ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणी देखील आमदार क्षीरसागर यांनी केली.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या सामाजिक दरी बाबत भाष्य केले. बीड जिल्ह्यात मराठा आणि वंजारी हे दोन मोठे समाज आहेत. पण आज जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की, दुकानदारांकडून साधी वस्तू विकत घेताना जात पाहिली जाते. एखादा अधिकारी जिल्ह्यात आला तर त्याच्या नावापेक्षा आडनाव पाहिले जाते. एखाद्या शाळेत मराठा समाजाची जास्त मुलं असतील तर वंजारी विद्यार्थ्याचे पालक त्या शाळेतून आपल्या मुलाचे अॅडमिशन काढून घेत आहेत, अशी सध्याची परिस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले. माझ्या जातीचे लोक जिल्ह्यात सुईच्या टोकावर मोजण्याइतके आहेत. तरीही बीडने मला दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी दिली आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करा, अन्यथा बीडमध्ये उद्रेक होईल, असेही क्षीरसागर यांनी म्हटले.

Comments (0)
Add Comment