मोदी कॅबिनेटचा शपथविधी पार पडल्यानंतर आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाह यांच्यावर पुन्हा एकदा गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं.
त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे.
बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी
बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हे खातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
-
कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे? पाहा संपूर्ण यादी
अमित शाह – गृहमंत्री
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री
नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय
जतीन राम – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME)
शोभा करंडजले – राज्यमंत्री एमएसएमई
निर्मला सीतारमन – वित्त मंत्रालय
शिवराज सिंह चौहान – कृषि मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील- जलशक्ती
किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
राज्यमंत्री
श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
मुरली मोहोळ – नागरी उड्डाण