मोहम्मद गौैस यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत,महायुती,महाविकास आघाडीला सुनावले खडेबोल

परभणी,दि 12 ः
परभणीत जाती-धर्मावर निवडणुका जिंकल्यानंतर सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचे उद्योग उभारणारे कसले कार्यसम्राट अशा शब्दात अपक्ष उमेदवार मोहम्मद गौस झैन यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला खडेबोल सुनावले आहेत.त्यांनी महायुतीवर देखील टिका केली आहे.मोहम्मद गौस यांच्यामुळे महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारासमोर तगडे आवाहन निर्माण झाले आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघात कृषी उद्योजक मोहम्मद गौस झैन हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत मोहम्मद गौस यांनी वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर कृषीवर आधारित उद्योग सुरू केला अनेकांच्या हाताला काम दिले आहे.मागील अनेक वर्षांपासून  शहरात सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. यंदाच्या निवडणुकीत झैन यांच्यामुळे रंगत आली आहे.अल्पसंख्याक समाजातील प्रमुख उमेदवार म्हणून झैन हे चर्चेत आले आहेत.या

त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे.माझी संकल्पना विकसित परभणी या नावाने त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे कृषीवर आधारित उद्योग उभारणीवर त्यांचा भर असणार आहे, शासनाची बंद पडलेली दूध डेरी विस्तारित करून एक लाख लिटर प्रति दिवस क्षमतेने सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.परभणीत नीट केंद्र तसेच निवासी अल्पसंख्यांक सीबीएससी शाळा आणणार आहेत प्रत्येक गावात वॉटर एटीएम उभारणार, कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करून दरवर्षी 2000 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत, ज्या गावांना सिंचनाचे पाणी नाही त्यासाठी नियोजन करणार,अन्नप्रक्रिया उद्योगाची निर्मिती करणार,प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता तसेच शहरात सांस्कृतिक नाट्यगृह उभारणार, खेळाडूंसाठी शहर आणि गावात क्रीडा अकॅडमी ची स्थापना करणार, जिल्हा शासकीय रुग्णालय आधुनिक स्तराने आणि पूर्ण क्षमतेने सुरु करणार, व्यसनमुक्ती केंद्र उभारणार, परभणीत हज हाऊसची स्थापना करणार असे त्यांच्या घोषणापत्रात त्यांनी सांगितले आहे.
मोहम्मद गौस यांना परभणी शहरात मोठा प्रतिसाद मिळत असून विविध भागात जाऊन ते नागरिकांशी संवाद साधत आहेत.एक अल्पसंख्यांक समाजातील उच्चशिक्षीत चेहरा म्हणून मोहम्मद गौस यांनी अन्य उमेदवारांसमोर तगडे आवाहन निर्माण केले आहे.

Comments (0)
Add Comment