मानव जातीचे एक स्त्रीलिंगी रूप म्हणजे स्त्री, महीला, जी संविधानान एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. स्त्री असो की पुरुष दोघही माणूस आहेत. पण अजुनही पुरुषप्रधान समाजात स्त्री ला दुय्यम स्थान किंवा तीला अबला, सबला या वाक्यांमध्येच गुंतवून ठेवले आहे. आज स्त्री सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करताना. स्वतः ला सिद्ध करीत आहे. पण अजूनही स्त्री म्हणून तीच्या कडे बघण्याचा दृष्टीकोण बदलत नाही. यासाठी स्त्री वर्गानेच विशेषतः आईने पुढाकार घेण्याची गरज आहे . जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी. ही लढाई पुरूष विरुद्ध स्त्री अशी नसून स्त्री अस्तित्वाची आहे. आईने बालपणातच मुलगा मुलगी भेद न करतां दोघांनाही एकमेकांचा सन्मान, आदर करण्याची बीज रोवली पाहिजेत . मुलगी परक्याच धन म्हणून पडती बाजू घेणं हे जस चुकीचं आहे. तसच मुलगा आहे त्यांनी काहीही केले तरी चालते हेही तितकंच चुकीचं आहे. आज दोघांच्या बाबतीत शिक्षणाची दारं उघडी असली तरीही मुलींचं उच्च शिक्षणातल प्रमाण अत्यल्प आहे, आजही लिंग गुणोत्तरात स्त्रियांचं प्रमाण कमी (तफावत) आहे, आजही बालविवाह प्रमाण अधिक आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा असूनही हुंडा पद्धती चालू आहे, अजुनही स्त्री शारिरीक, मानसिक त्रासाला सामोरं जात आहे,
स्त्री ही पुरुषापेक्षा कितीतरी सक्षम आहे याचं उदाहरण म्हणजे एखादी ही शेतकरी महीला आत्महत्या करीत नाही किंवा कोणतीही विपरित परिस्थितीला कंटाळून स्त्री हार मानत नाही तर खंबीरपणे तोंड देत उभी राहते.
आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सर्वांना उच्च शिक्षित कमवणारी सून,बायको हवी असते पण ती परंपरागत सून, बायको असावी, तीने सर्व रीती रिवाज पाळावे हा अट्टाहास असतो . ती बरोबरीने अथवा एखाद्या वेळी एकाच फिल्ड मध्ये काम करतं असली तरी घरची, मुलांची जबाबदारी तिचीच असते, संसाराचा गाडा चालवण्यासाठी तीने कमवले पाहिजे पण सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पुरुषाचे.
कदाचित काही प्रमाणात असे नसेलही किंवा असे नाहीं हे दाखवल्या जात असेल. पण बहुतांश ठिकाणी हिच परिस्थिती पाहायला मिळते
आज अस बोललं जातं की मुली जास्तं शिकल्या म्हणून किंवा आईचा खुप लुडबुड वाढल्याने कुटुंब व्यवस्था बिघडत चालली. असेलही काही प्रमाणात खरं. अपवाद असतात प्रत्येक व्यवस्थेत. पण शिक्षणं माणसाला समृद्ध करीत असतो.
म्हणुनच म्हणते स्त्री मध्ये ही परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. आई म्हणून मुल घडविण्यात तीचे योगदान खुप मोठे आहे शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊ मासाहेब हे याच उत्कृष्ट उदाहरण आहे. बालपणापासून च मुलगा मुलगी यांच्यात भेद न करतां आणि प्रत्येक वेळी प्रत्येक कामात फक्त त्यांच्या सोबत राहावे. बहुतांश वेळा आपण मुलांच्या चूका असूनही त्यांना पाठीशी घालतो. आणि त्यातून त्यांना आपणं काहीही केले तरी चूका केल्या तरी आपले पालक आपल्या पाठीशी आहेत ह्यामुळे ते भविष्यात कसही वागण्याला मान्यता आहे असे समजतात. आणि चुकीच्या गोष्टीन योग्य समजायला लागतात. पालकांचं चुकीच्या गोष्टींचं अनुकरण ही त्यांना बरोबर आहे असे वाटते.
आणि आजच्या सोशल मीडिया व तंत्रज्ञानाच्या युगात आजच्या आईला मुल सांभाळताना अनेक पातळ्यांवर काम करावं लागणार आहे. तीला ह्या आजच्या आव्हानंना सामोरं जाताना. प्रत्येक गोष्टी ला मुलांना विरोध न दर्शवता किंवा आम्हाला जे मिळालं नाही ते देण्याच्या नादात ते चुकीचे पाऊल उचलू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या सोबत राहून ते करीत असणाऱ्या कृतीचा चांगला अथवा विपरित परिणाम त्यांना सांगितला पाहिजे. मुलांना लहान पणातच मुलींशी वागताना संयमान वागायला शिकवलं पाहिजे. स्त्रीचा आदर करण शिकवल पाहिजे. तर मुलींनाही चांगल्या वाईटाची पारख करायला शीकवल पाहिजे.तीलाही मोठ्यांचा सन्मान करावा हे सांगितले पाहिजे.ती वापरायची वस्तू नसून तीला तीच्या स्वअस्तित्वाची जाणीव करून द्यावी . तीला तीची कर्तव्य माहिती करून द्यावीत. पण अन्याया विरोधात ताकदीनं लढण तीला आल पाहिजे. नात्यांचं महत्व मुल- मुली दोघांनाही पटवून द्यावें. नात टिकवण ही दोघांची ही जिम्मेदारी आहे. त्या साठी एकट कुणीही जबाबदार नसत. किंवा प्रेमाच्या नावाखाली होत असणाऱ्या विघातक गोष्टींची माहिती त्यांना दीली पाहिजे. कुटुंब व्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि तो मजबुत होण्या साठी मी आणि माझ या पलिकडे पाहायला सांगावे लागेल. आणि ह्या सर्व संस्काराची रुजवण आई चांगल्या पद्धतीने करू शकते.
त्यामूळे आज घडत असणारे गुन्हे, मुलींवर होणारे अत्याचार, व्यसनं, व्यभिचार, बलात्कार, हल्ले ई वर बऱ्याच प्रमाणात अंकुश बसेल. पण त्या साठी आईला भक्कम पणाने विचार परिवर्तनाचा विडा उचलावा लागेल. व संस्कारीत पिढी घडविण्याची जबाबदारी घ्यावी लागेल मग ही मानव जात सबल, सक्षम बनेल.
सौ. जया बाळासाहेब जाधव
मुख्याध्यापिका
सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल,
परभणी