कैलास चव्हाण
परभणी,
राजकारणात सध्या काय होईल ते कधीच सागंता येत नाही.त्याचा प्रत्यय क्षणाला येत आहे. परभणी लोकसभेचे महायुतीचे प्रबळ दावेदार राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर (NCP leader Rajesh Vitekar is the strong contender of the Grand Alliance for the Parbhani Lok Sabha seat) यांच्या अगदी जवळ आलेली उमेदवारी अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीनेच हिसकावली. रासपचे महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मिळालेली उमेदवारी ही आणखी विटेकरांच्या जखमेवर मिठ चोळणारी ठरणार आहे.जानकरांना दिलेली उमेदवारी ही स्थानीक भाजपा नेतृवाला देखील मिळालेला धडा आहे,बारामतीच्या सुरक्षेसाठी विटेकरांचा राजकीय बळी अशी चर्चा परभणीत रंगली आहे.सध्या तरी राष्ट्रवादी व भाजपा व शिवसेना शिंदे गट यांच्यासाठी ना तेरा ना मेरा अशी अवस्था महायुतीच्या या त्रिकुटांची झाली आहे.
परभणी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमदेवाराचा घोळ अनेक दिवसापासुन सुरु होता.आज अखेर तो मिटला असला तरी सुप्त राजकारणात पुढे काय होईल तो येणारा काळच ठरवणार आहे.2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना तगडे आव्हान दिले होते. विटेकरांचा निसटता पराभव झाला असला तरी संपूर्ण राज्यभर या निवडणुकीची चर्चा झाली. तेव्हापासून विटेकर अधिक जोमाने कामाला लागले. त्यामुळे 2024 मध्ये विटेकर हेच उमेदवार याच कल्पनेतून राष्ट्रवादी कामाला लागली होती. स्वतः विटेकर हे देखील मागील वर्षभरापासून अधिक कामाला लागले होते. संपूर्ण तयारी झाली होती, राष्ट्रवादीकडून देखील अगदी चार दिवसांपूर्वी विटेकरांना ग्रीन सिमला मिळाला होता परंतु रासाचे जानकर हे पुन्हा महायुती राहिल्याने जानकर यांना कोणता मतदारसंघ द्यायचा यावरून महायुतीत खलबते सुरू झाली. दरम्यान जानकर देखील मागील वर्षभरापासून परभणीत निवडणूक लढवणार असे ठासून सांगत होते. परभणी मतदार संघात रासपचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांची गंगाखेड मतदार संघात असलेली ताकद,जिल्ह्यात असलेली ओबीसी मतदारांची व्होट बॅंक यामुळे जानकरांचे लक्ष परभणीवर होते.जानकर अनेक महिण्यापासुन स्वत:परभणीत लढणार असले सांगत असले तरी महायुतीमध्ये अधिकृतपणे कोणी बोलत नव्हते, जानकर स्वतःच आपली उमेदवारी जाहीर करत होते,तिकडे विजय शिवतारे,हर्षवर्धन पाटील यांच्या बारामती मतदार संघावर असलेली पकड व सध्याची नाराजी पाहता जानकरांना नाराज करणे राष्ट्रवादीला परवडणारे नसल्याने जानकरांनी देखील हेच ओळखुन आपला दबाव कायम ठेवला व अखेर जानकरांचा हा दबाव कामी आला आणि राष्ट्रवादीला बारामती सुरक्षित करण्यासाठी परभणी वर पाणी फेरावे लागले या सर्व घटनाक्रमामध्ये राजकीय बळी गेला तो राजेश विटेकरांचा असे परभणीत बोलले जात आहे.
ना तेरा ना मेरा
भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारासाठी चढाओढ सुरू होती. बोर्डीकर कुटुंब तसेच परतूरचे आमदार बबनराव लोणीकर,डॉ.केदार खटिंग यांच्यात तिकिटावरून चढाओढ सुरु होती. राष्ट्रवादी की भाजपा हा देखील एक संघर्ष पाहायला मिळाला. कमळच पाहीजे असा एक सुर भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यात होता. तर कधी शिवसेना शिंदे गट देखील उमेदवारी मागत होते.परंतु ना राष्ट्रवादी ना भाजपांना शिवसेना थेट जानकर, यामुळे आता भाजपातील नेतेमंडळी तन-मन धनाने मैदानात उतरणार का हा देखील मोठा प्रश्न आहे. मागील काही महिन्यांपासून भाजपाच्या नेत्यांनी परभणीत चांगली तयारी केली होती, परंतु त्यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून येत होता यासोबतच राष्ट्रवादीसोबत असलेला सुप्त संघर्ष देखील समोर येऊ लागला. याचाच फायदा जानकारांना झाला असे देखील बोलले जात आहे. आता परभणी जिल्ह्यातील असलेली सर्व राष्ट्रवादीची ताकद ही जानकरांच्या पाठीशी उभी राहते का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.