पूर्णा, सुशिलकुमार दळवी – नगरपरिषद पूर्णा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत शहर कार्यकारणी समितीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला समितीमधील अध्यक्ष मुख्याधिकारी अजय नरळे व सर्व सदस्य उपस्थित होते या बैठकीमध्ये अभियानाची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी करावयाचे प्रयत्न व आर्थिक भौतिक उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न यावर चर्चा करण्यात आली व अभियानाची पूर्ण माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर यांनी समितीच्या सदस्यांना देण्यात आली.
सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या कार्यालयामार्फत कोणकोणत्या शासकीय योजना चालतात याची माहिती देण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दर महा बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. समुदाय संघटक पुष्पा बनसोडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.