पूर्णा,दि 26 (प्रतिनिधी)ः
शहरातील तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्धन आवरगंड यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्य तक्रार तक्रारी वरचे निराकरण अखिल भारतीय ग्राहक पंचायत याचे उगमस्थान व ग्राहकांचे होणारे नुकसान फसवणूक यावर डोळसपणे खरेदी करावी व कुठल्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये
ग्राहकांनी अतिशय जागरुकपणे खरेदी करावी. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. पासवर्ड कुणालाही शेअर करु नये. आपले आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावे अशी माहिती दिली
तहसील कार्यालयात आज तहसीलदार माधव बोथीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर नायब तहसीलदार मस्के यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्धन आवरगंड प्रमुख पाहुणे सय्यद सलीम सुहागनकर राधाताई दुधाटे सुनीताताई सोनवणे संजय पांचाळ विष्णू चापके अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शन वितरण महामंडळाचे एम पी खर्गे आरोग्य विभागाचे मेडिकल ऑफिसर डॉ. रणवीर डॉ. मोहिनी कदम अब्दुल फारुकी औषधी निर्माता वैद्यमापन शास्त्र संभाजी बिल्वे तालुका स्वस्तभाव दुकानदार संघटना माजी सभापती अशोक बोकारे पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी सतीश नाईक पुरवठा निरीक्षक प्रदीप मोरे तालुका गोदाम व्यवस्थापक तेजस कर्डक गोदामपाल अंगद भारशंकर सातपुते यासह दुकानदार मेडिकल वाले इत्यादींसह अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.