व्हिजन इंग्लिश स्कुल मध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन मोठ्या उत्साहात साजरा 

सेलू (नारायण पाटील )
शिक्षण क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करणाऱ्या व्हिजन इंग्लिश स्कुल च्या वतीने  १ जानेवारी सोमवार रोजी  राष्ट्रीय एकात्मता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

यावेळी व्यासपीठावर व्हिजन इंग्लिश स्कुल चे संचालक अध्यक्ष संतोष कुलकर्णी , प्रसिद्ध रंगकर्मी रवी कुलकर्णी ,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव अंभोरे , जेष्ठ पत्रकार नारायण पाटील ,दिलीप डासाळकर तसेच सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती .

सरस्वती देवी तसेच गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या  हस्ते  पूजन करण्यात आले .शिक्षणा सोबतच संस्कार देणारी व्हिजन इंग्लिश स्कुल ही शहरातील एकमेव शाळा असल्याचे प्रतिपादन यावेळी मनोगतात पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे यांनी स्पष्ट केले .तसेच माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज प्रमुख अतिथी म्हणून जो सन्मान दिला त्याबद्दल सुनील गायकवाड यांनी  मनोगतात व्हिजन इंग्लिश स्कुल चे आभार मानले .

अर्थ मंत्रालयात असलेला आपला पाल्य याच व्हिजन स्कुल चा विद्यार्थी असून याचा मला सार्थ अभिमान  असल्याचे यावेळी प्रसिद्ध रंगकर्मी रवी कुलकर्णी यांनी स्पष्ट केले .

संस्थेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची ओळख व्हावी व त्यांच्या मध्ये एकात्मता रुजविण्यासाठी दरवर्षी हा एकात्मता दिन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येत असतो .व यावेळी विद्यार्थी त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करीत असतात .असे प्रतिपादन व्हिजन इंग्लिश स्कुल चे संचालक संतोष कुलकर्णी यांनी यावेळी केले .

प्रसिद्ध रंगकर्मी रवी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

यावेळी विद्यार्थ्यांनी राज्यस्थान ,कर्नाटक ,महाराष्ट्र ,केरळ  पश्चिम बंगाल ,तामिळनाडू,उत्तर प्रदेश ,गुजरात  आदी  राज्यातील पारंपरिक वेशभूषा  ,भाषा व नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दिले . उत्तर प्रदेश मधील लवकरच तयार होणाऱ्या राममंदिर बाबत देखील यावेळी सादरीकरण करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता माने यांनी केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर लगेच स्पर्धेचा परितोषक वितरण कार्यक्रम पार पडला .यामध्ये सर्वप्रथम ३० डिसेंबर रोजी व्हिजन स्कुल मधील इयत्ता ४ ते ८ मधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या व्हिजन स्पेशल टेस्ट मधील यशस्वी झालेल्या प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले .तसेच  विविध राज्यातील कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आलेल्या संघाला देखील पारितोषक देण्यात आली .यामध्ये प्रथम क्रमांकाचे २०००/- रुपये रोख परितोषक गुजराज संघाला तर द्वितीय परितोषक १०००/- मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश संघाला विभागून देण्यात आले .तृतीय क्रमांकाचे ५००/- रोख परितोषक पश्चिम बंगाल व महाराष्ट्र यांना विभागून देण्यात आले .या परितोषक वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राचार्य हर्षद पांडव यांनी केले .यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती .

Comments (0)
Add Comment