पुणे ,दि 23 ः
पुरंदरतालुक्यातील बोपगाव येथील शेतकरी कुटुंबातील नवनाथ फडतरे यांनी नेट परिक्षेत जीआरएफ प्राप्त झाली आहे.आंतराष्ट्रीय सबंध या विषयात हे यश मिळाले आहे .नुकतेच डिसेंबर मध्ये झालेल्या नेट परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.
यापुर्वी ,गेट परीक्षा तसेच नेट इतिहास , संरक्षण आणि सामरिक शास्ञ आणि आता आंतराष्ट्रीय सबंध याविषयामधुन नेट जीआरएफ प्राप्त झाली आहे .सध्या ते आय.आय.टी गुवाहाटी ,आसाम राज्य येथुन ” इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अँड इंटरनॅशनल हिस्टरी ” मध्ये पी.एच.डी करत आहेत
फडतरे यांनी पुणे साविञीबाई पुणे,विद्यापीठातुन पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले असून इंडीयन इंट्यिट्युट आॅफ टॅक्नोलाॅजी अर्थात आय. आय. टी गुवाहाटी मधुन पदव्युत्तर पदवी पुर्ण केली आहे.
मराठी माध्यमांतुन शिक्षण घेऊनही कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभुमी नसताना नवनाथ भारतातील नामांकीत असणाऱ्या आय. आय. टी प्रवेश मिळवला .
नवनाथ यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण, आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावात वर्गखोल्या नसल्याने गावातील मंदिरात बसुन पूर्ण केले. अकरावी -बारावीत असताना जास्त वेळ कॅालेज न करता शेतातील कामे तसेच, डोंगरावर जनावरांना चारायला नेताना तिकडे इंग्रजी पुस्तकांचे वाचन तसेच प्रवास करताना बसमधुन ये- जा करताना मोकळ्या वेळेत इंग्रजी व्याकरण आणि शब्दभंडार वाढविण्यासाठी कायम भर देत असत. याचा त्यांना भविष्यात फायदा होत गेला.
पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधुन शिक्षण दिल्यानंतरच, खासगी शिकवणीसाठी लाखो रुपयांची फी भरल्यानंतरच मुलं -मुली यशस्वी होतात हे चुकीचे असल्याचे सिदध करुन दाखवले आहे. आत्तापर्यंतचा शैक्षणिक आलेख कोणताही क्लास न लावता उंचावला आहे.
परिस्थिताचा बाऊ न करता कोणतीही कारणं न सांगता भरपुर मेहनत आणि ज्या क्षेञात जायचे, त्या क्षेञात स्वत:ला पुर्णपणे झोकुन दिले तर सर्वसामान्य गोरगरिब शेतकरी कुटुंबातील मुलं – मुली देखील देखील आपल्या आई- वडीलांचे नाव उंचावुन समाजात चांगले आदर्श निर्माण करु शकतात असे फडतरे यांनी सांगितले.
विविध राष्ट्रीय परिक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवुन नवनाथ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. बोपगाव या छोट्याशा गावातील नवनाथ यांची गरुडक्षेप सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
फडतरे यांचे वडिल निवृत्त सैनिक आहेत. बंधू , ॲड . दत्ताञय फडतरे यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त करून कायद्याचे शिक्षण पुर्ण केले आहे ,ते सध्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय , सासवड येथे प्रॅक्टीस करत आहेत.
आईचे चे शिक्षणासाठी मिळत असलेले पाठबळ आणि प्रोत्साहन, बंधु राकेश यांचे सर्वच बाबतीत सहकार्यामुळे यश मिळाल्याची भावना नवनाथ यांनी व्यक्त केली.
अधिक माहीतीसाठी
ॲड. दत्तात्रय फडतरे
मोबाईल 7588072685