गंगाखेड, प्रतिनिधी – गंगाखेड येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री माधव साहेबराव भोसले यांचे वडील महाविकास आघाडी तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती वर निवडून आले होते , गंगाखेड क्रशी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने श्री साहेबराव भोसले यांनाच महावीकास आघाडी कडून सभापती करण्यात येणार असल्याचे निश्चित झालेले होते. तरीही माधव भोसले व त्यांचे वडील साहेबराव भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महविकास आघाडीला धोका देत रासप पक्षाशी हात मिळवणी केली. याबाबत गंगाखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते माजी आमदार श्री सिताराम घनदाट व माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी यांनी केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
गंगाखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माधव भोसले यांची गंगाखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.