नवीन शैक्षणिक धोरण 20-20 उच्च शिक्षणातील अभूतपूर्व बदलाची नांदी- प्राचार्य डॉ.एस.शंकर

परभणी, प्रतिनिधी – विद्यार्थी आणि शिक्षकांनी शिक्षण प्रवाहातील बदलते स्वरूप लक्षात घेत शैक्षणिक क्षेत्रातील विधायक क्रांतीसाठी तत्पर राहावे.नवीन शैक्षणिक धोरण नाविन्यपूर्ण संधीं असून समस्या मुक्त लोकजीवन निर्माणाची गुरुकिल्ली आहे. मातृभाषा हे प्रचार आणि प्रसाराचे उत्तम समन्वयाचे माध्यम असून ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही दृष्टिकोनातून लोकजीवनात सुसंवादी राहात शिक्षणाचे महत्त्व वाढीस लावण्याचे कार्य शिक्षकांनी जाणिवपूर्वक आणि जबाबदारी ने स्विकारत सम्यक परिवर्तन साधावे. प्रत्येक शिक्षकाने एनइपी ट्वेंटी-ट्वेंटी चा अभ्यास करून उच्च शिक्षणामधील बदलाची नोंद घेत परिस्थिती आणि परिवारासह येणाऱ्या अडीअडचणी आणि त्यावरील उपाय यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन प्राचार्य डॉ एस.शंकर यांनी केले.

 

कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय (kamaltai jamkar womens college parbhani) परभणी येथे आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय पातळीवरील एनईपी इम्प्लिमेंटेशन घ्या अनुषंगाने एन ई पी ट्वेंटी-ट्वेंटी द रोड अहेड फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया या विषयावर डॉ एस.शंकर बोलत होते.

 

प्रसंगी डॉ.शंकर यांनी एन इ पी तील ९ ते १९ मुद्द्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करत प्रौढशिक्षणाचे ही महत्व विशद केले.आधुनिक तंञज्ञानाचा वापर करत शिक्षकाने वंचितांना सोबत घेत समृध्द माणसां सह समाज बांधणीचे कार्य करावे.पाहुण्यांचा परिचय डॉ.ओमप्रभा लोहकरे यांनी करुन दिला.सूत्रसंचलन व आभार प्रा.महेश जाधव यांनी केले.

dr. s. shankar newskamaltai jamkar mahavidyalaya newsparbhani college newsparbhani news
Comments (0)
Add Comment