आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार..नारायण राणेंचं सूचक विधान

सिंधुदुर्गच्या जिल्हा बँक निवडणुकीत आज भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. नितेश राणे यांच्या मेहनतीला यश मिळाले असून, या विजयाचे श्रेय जनता, भाजपचे कार्यकर्ते यांना जाते अशा भावना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केल्या आहेत. तसेच या बँकेवर आपली नाही तर भाजपची सत्ता आल्याचे राणेंनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर आपले लक्ष राज्याकडे असेल असे राणेंनी सांगितले. राज्याला मुख्यमंत्री नसून, राज्य अधोगतीच्या मार्गावर असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे असल्याचे देखील ते म्हणाले. जिल्हा बँक ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांच्यासाठीच काम केले जाईल. असेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले तरी ते जिंकू शकले, ज्यांचे चेहरे सुद्धा पाहावत नाहीत, त्यांना लोक संधी देणार नाही असे नारायण राणे यांनी म्हटले.

नारायण राणे म्हणाले, जिल्हा बँकेनंतर आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. अजून अडीच वर्ष आहे विधानसभा. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा आणि खासदार हा भाजचाच असेल. गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. आता महाराष्ट्राकडे लक्ष म्हणजे काय तिकडे आमची सत्ता नाही. थोडक्यात हुकली. महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची आणि चांगल्या सत्तेची गरज आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही.

Comments (0)
Add Comment