परभणी,दि 26 ः पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा देऊन शुक्रवारी (दि.26) त्यांना नवा मोंढा पोलीसांनी जिल्हा संपर्क कार्यालयातून ताब्यत घेत स्थानबध्द केले
तब्बल आठ महिण्यानंतर पालकमंत्री सावंत हे परभणीत आले आहेत. त्यांच्या दौऱ्याला काही गाल बोट लागूनये म्हणून गुरुवारी संध्याकाळी पासूनच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन १४९ च्या नोटीस बजावण्यात आल्या.शुक्रवारी सकाळी ०८ वाजता स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या मागावर पोलीस होते. ठरल्या प्रमाणे ठिक १०:०० वाजता स्वाभिमानीच्या जिल्हा कार्यालयावर सर्व पदाधिकारी जमले असता. मोंढा पोलिसांनी सर्व पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन मोंढा पोलीस स्टेशनला नेऊन अटक करून स्थानबद्ध केले. या वेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे,भास्कर खटिंग, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजभाऊ लोडे, माऊली शिंदे, उद्धव जवंजाळ, मोकिंद वावरे, बाळासाहेब ढगे हे कार्यकर्ते होते.