आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र भरातून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. वारकरी साहित्य परिषद मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली. वारकरी साहित्य परिषद मंडळाच्या शिष्टमंडळाने दिंड्यांना ५० हजार रुपये द्यावेत, अशी सरकारकडे मागणी केली होती. चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोच्या संख्येने दिंड्या-पालख्या दरवर्षी निघत असतात. या सगळ्या पालख्या पायी चालत आषाढीच्या आधी एक दिवस पंढपुरात पोहोचत असतात. परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात, दुखापतग्रस्त होतात, एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा मृत्यू होतो. तसेच अनेकांना अनेक कारणांनी वारी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडेल, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन शासनाने २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांमध्ये मोठ्यासंख्येने वारकरी सहभागी होतात. या सर्व पालख्या आणि दिंड्यांसोबत वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जातात आणि आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी पंढपुरात दाखल होतात. परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात, वारकऱ्यांना दुखापतग्रस्त होते, एखाद्या वारकऱ्याचा अपघातात किंवा दुर्घटनेत मृत्यू होतो. तसेच अनेक वारकऱ्यांना काही कारणांनी वारी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडेल, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केली होती. त्यांच्या विनंतीनंतर सरकारने २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.