पुर्णेत शिवजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम,शहरात निघणार भव्य मिरवणूक

पुर्णा,दि 17 (प्रतिनिधी) ः
प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी देखील पुर्णा शहरात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती  निमित्त भरगच्च विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन शिवप्रेमींचां उत्साह ओसंडून वाहत आहे.
पूर्णा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने 18 फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री नऊ ते 11 वाजेपर्यंत ह. भ. प. शिवचरित्रकार सुरेश महाराज नाईकवाडे पुणे यांचे कीर्तन महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे त्याच दिवशी रात्री बारा वाजता शिवजन्म उत्सवचा पाळणा हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत पूर्णा शहरातून भव्य पारंपारिक शिवजन्मोत्सव मिरवणूक पूर्ण शहरातील महादेव मंदिर या ठिकाणावरून निघेल या मिरवणुकीचे मुख्य आकर्षक लिमला व ताडकळस येथील लेझीम पथक तसेच नांदेड येथील जगदंबा ढोल ताशा व ध्वज पथक हे राहणार असून शहरी व ग्रामीण भागातील भजनी मंडळी यांचे भजन गायन देखील या मिरवणुकीत राहणार आहेत
या मिरवणुकीत हत्ती व घोडे व आकर्षक रथ सजावट राहणार आहे शहरातील श्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास रात्रीच्या वेळी आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली असून या जन्मोत्सवात शहरातील व ग्रामीण भागातील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवजयंती जन्मोत्सव समिती पूर्णा च्या वतीने करण्यात आले आहे.

Comments (0)
Add Comment