परभणी, दि. 07 : मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर येथील एका आस्थापनेसाठी आयटीआय फिटर (20), वेल्डर (50), पेंटर (25) आणि शीट मेटल वर्क्ससाठी (15) शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दि. 9 मे रोजी सकाळी 10 वाजता केले आहे.
तरी जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार विकास आडे यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.