सेलू,दि.२६(प्रतिनिधी) :
येथील ज्येष्ठ संगीततज्ज्ञ संगीतरत्न पं. हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवार दि. 28 डिसेंबर व रविवार दि. 29 डिसेंबर असे दोन दिवस संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात ख्यातनाम कलाकार सादरीकरण करणार आहेत.
सेलू येथील साई नाट्यगृहात रोज सायंकाळी 6.30 वाजता हा महोत्सव संपन्न होणार असून यामध्ये जयपुर घराण्याच्या गायिका यशस्वी साठे सरपोतदार, यती भागवत (तबला सोलो), विदूषी पार्वती दत्ता यांचे शिष्यगण (कथ्थक), मेवाती घराण्याचे गायक कृष्णराज लव्हेकर, उस्ताद विलायत खां यांच्या परंपरेतील युवा सतारवादक मेहताब अली नियाजी, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक धारवाडचे पं. कैवल्यकुमार हे कलाकार सहभागी होणार आहेत. या कलाकारांना साथसंगत शांतीभुषण देशपांडे, यश खडके, अनिरूद्ध देशपांडे, प्रशांत जोशी, स्वप्नील भिसे व यती भागवत हे करणार आहेत. दरम्यान, रसिकांनी या दोन दिवशीय संगीत महोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन संगीत महोत्सव संयोजन समिती व देवगिरी संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.