सेलूत गुरुपौर्णिमे निमित्त भागवत कथेचे आयोजन

सेलू ( नारायण पाटील )
श्री हरी कृपे करून गुरुपौर्णिमे निमित्त समस्त गोंदीकर महाराज शिष्य परिवाराच्या वतीने ” श्रीमद भागवत ” कथेचे आयोजन दि २७ जून पासून करण्यात आले आहे .
येथील विद्यानगर भागातील कालिंका देवी मंदिरात आयोजित या भागवत कथेचे निरूपण दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणी मधून होणार आहे .
दि २७ जून रोजी भागवत ग्रँथ व स्थापित देवतांच्या विधिवत पूजन होणार असून त्यानंतर कथेला प्रारंभ होणार आहे .
दररोज भागवत कथेच्या आरती नंतर सायंकाळी हरिपाठ ,महिला व पुरुष मंडळींचे भजन होणार आहे .
३ जुलै रोजी भागवत कथेची सांगता होणार असून त्या दिवशी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिष्य परिवाराकडून सद्गुरू नंदकुमार महाराज गोंदीकर यांचे गुरुपूजन ,महाआरती व त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी सर्व शिष्य तसेच भाविक भक्तांनी या भागवत कथा श्रवणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

Comments (0)
Add Comment