सेलू,दि 26 ः
येथील विद्यानागर मधील कालिंका देवी स्थापनेला २७ वर्ष पूर्ण झाली असून देविचा २७ वा वार्षिकउत्सव २७ डिसेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे .
या कार्यक्रमात सकाळी ८ वाजता आनंतकुमार विश्वंभर यांच्या हस्ते सपत्नीक कलिंका देवीच्या मूर्तीस अभिषेक व देवीची महापूजा होणार आहे .यावेळी पद्माकर हदगावकर हे पौरोहित्य करणार आहेत .तसेच सकाळी साडेदहा वाजता मंदिर संस्थानच्या वतीने मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये नामदार मेघना साकोरे ( बोर्डीकर )
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर ,माजी आमदार हरिभाऊ काका लहाने तसेच माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा तसेच समाजाचे नेते मध्यवर्ती समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर ( माजलगाव )व ज्ञानेश्वरी पारायण फंड सोहळा ,आळंदी चे अध्यक्ष अरूणराव बेळापुरे ( माजलगाव ) या मान्यवरांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे .
तसेच दुपारी १२.१० वाजता देवीची महाआरती होणार असून दुपारी २ ते ५ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .या महाप्रसादाचे मानकरी आनंतकुमार बबनराव व राजश्री आनंतकुमार विश्वभंर हे राहणार आहेत .
लक्ष्मण भास्करराव शेटे ,बालाजी माधवराव वानरे ,चंद्रकांत पंढरीनाथराव सासवडे ,धोंडिरामजी सुधाकरराव ढोके ,मुंजा भास्करराव शेटे यांची चहापान व अल्पोपहार सेवा राहणार असून जलसेवा जीवन नारायणराव खरावणे यांची राहणार आहे .
विशेष म्हणजे शिवाजीराव बाबा शिनगारे हे परभणी येथील समाजबंधू निशुल्क स्वयंपाकसेवा देणार आहेत .
तरी सर्व समाजबांधव ,भगिनी व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा तसेच सत्कार सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक कलिंकादेवी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .