काळानुरूप घरातील देव्हाऱ्याची रूपे बदलली

 

सेलू, नारायण पाटील – फ्लॅट संस्कृतीमुळे घराघरातील पारंपरिक देव्हाऱ्याची रूपे बदलत चालली असून संगमरवरी कडे लोकांचा कल वाढत आहे.

 

देवघर हा घराचा आत्मा असतो .व या देवघरात पूजाअर्चा करून सकारात्मक ऊर्जेने दिवसाची सुरुवात होते .त्यामुळे भारतीय संस्कृतीत देवघराला अनन्यसाधारण महत्व आहे.

 

आपले दैवत ,श्रद्धास्थान व आस्था असलेल्या देवता देवघराच्या माध्यमातून घराघरात निवास करतात .व या देवासमोर पूजाअर्चा करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे.

परंतु बदलत्या कालानुरूप या देवघराची रुपे मात्र बदलत चालली आहेत. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात देवघरासाठी एक स्वतंत्र खोलीच असायची व त्या खोलीत पूजेसाठी लागणारे सोवळे, पाणी, देववस्त्र आदी साहित्य असायचे. परंतु आता फ्लॅट संस्कृतीमुळे जागेनूसार व क्षमतेनुसार देवघराची जागा व आकार देखील छोटा होत चालला आहे. बऱ्याच ठिकाणी तर स्वयंपाकाच्या ओट्या खालीच देवघराची जागा केली जाते.

 

पूर्वीच्या काळी असलेल्या सागवान लाकडापासून व सुबकदार नक्षीकाम केलेल्या देवघराची जागा आता मार्बल व संगमरवराच्या दगडांनी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

मनःशांती व सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असलेल्या देवघराचे खूप महत्व आहे .पूर्वी शिसम व सागवानी लाकडापासून देवघर बनवले जात होते व त्यावर हत्ती ,मोर, कमळ, स्वस्तिक, गरूड असे कोरीव काम केलेले असायचे. परंतु किंमत व जागेअभावी या लाकडी देघराची जागा आता संगमरवरी किंवा मार्बल दगडाच्या देवघराने घेतली आहे.

Comments (0)
Add Comment