देवगांवच्या अभिनव शाळेत कागदी पतंग बनवणे कार्यशाळा

रामभाऊ आवारे निफाड

देवगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित अभिनव बालविकास मंदिर शाळेत मकरसंक्रांत सणानिमित्त तसेच दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत पतंग निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.मुख्याध्यापक सुदर्शन जाधव यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा,पतंगाला नायलॉन मांजा ऐवजी साध्या दोऱ्याचा वापर करून मोकळ्या मैदानात पतंग उडविण्याची माहिती दिली.
उपशिक्षक नितेश राऊत यांनी पतंग बनवण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.विद्यार्थ्यांनी पतंगासाठी दैनिक वृत्तपत्राचा कागद,कॅलेंडरचा कागद,झाडूच्या काड्या,विविध‎ प्रकारचे सजावटीचे साहित्य‎ वापरून लहान मोठे विविध आकारात आकर्षक पतंग बनवण्याचा आनंद घेतला.पतंग उडवताना‎ आम्ही नायलाॅन मांजाचा वापर‎ न करण्याची,मकरसंक्रांती म्हणजे एकमेकांशी‎ असलेले आपले नाते अधिक गोड‎ करण्याचा दिवस म्हणून तो साजरा‎ करताना कुणालाही इजा होणार‎ नाही याची दक्षता पतंग उडवताना‎ आम्ही घेऊ अशा पद्धतीत‎ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.हिवाळ्यात स्निग्ध पदार्थांची शरिराला गरज असते म्हणुन तीळ, गुळ, गाजर, हरभरे, ऊस, बोरे यांचे महत्व उपशिक्षिका आशा सोनवणे यांनी सांगितले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोचरे,प्राचार्य कैलास गाजरे,पर्यवेक्षक भानुदास उफाडे यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी कोकाटे, जयश्री गांगुर्डे, सोनाली उन्हवणे, किरण आहेर,निलेश काशीद, प्रताप मोरे, वंदना उराडे, सुरेखा मोरे, मनिषा शेळके यांनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment