तरुणांना रोजगार व महिलांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ कटिबद्ध आहे-आशिष दामले

 

सेलू / नारायण पाटील – सर्व समाजबांधव व परशुराम संघटना यांच्या संघर्षातुन परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली असून समाजातील तरुणांना रोजगार व महिलांना व्यवसाय मिळवून देण्यासाठी हे महामंडळ कटिबद्ध असल्याचा विश्वास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी सेलू येथील कार्यक्रमात बोलतांना दिला .

 

तालुक्यातील आर्थिक दुर्बल सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शैक्षणिक तसेच व्यवसायिक उभारणीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ नियोजनाबाबत चर्चा व महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन परशुराम संघटना सेलूच्या वतीने करण्यात आले होते .

येथील केशवराज बाबासाहेब मंदिर मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमासाठी महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले ,अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष निखिल लातूरकर ,प्रदेश उपाध्यक्ष सोनलताई भोसीकर , कऱ्हाड शहराचे भा ज प उपाध्यक्ष शार्दूल चरेगावकर , भा ज पा उदयोग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित देशपांडे , भा ज पा चे परभणी जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर, अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाढे , बहुभाषिक ब्राम्हण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे, परशुराम संस्कार सेवा संघाचे प्रकाश केदारे ,परशुराम संघटना सेलूचे अध्यक्ष मनोज दीक्षित ,सचिव सौरभ देशपांडे ,उमेश विडोळीकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती . मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले .
यावेळी स्वप्नील पिंगळकर यांनी प्रास्ताविक परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापने मागील उद्देश स्पष्ट केला .तर उमेश विडोळीकर यांनी परशुराम संघटना सेलू च्या आतापर्यंत केलेल्या कार्याचा व उपक्रमाचा लेखा जोखा मांडला .

यावेळी बोलतांना दामले पुढे म्हणाले की,परशुराम संघटना सेलूचे कार्य अगदी वाखाणण्याजोगे आहे .या संघटनेत तरुणांनी महिलांना देखील मोठ्या प्रमाणावर सामावून घेतले आहे .व समाजातील जेष्ठ मंडळी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करताना .या संघटनेला महामंडळाच्या माध्यमातून न्याय देण्याचे कर्तव्य मी निश्चित पार पाडणार आहे .

यावेळी परशुराम संघटनेच्या वतीने आयोजित महिलांसाठी दोन दिवसीय घरगुती वस्तू निर्मित दोन दिवसीय प्रदर्शनात सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले . तसेच संघटनेच्या वतीने हात मदतीचा उपक्रमाअंतर्गत समाजातील गरीब व्यक्तींना देण्यात येणाऱ्या किट चे प्रतिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले .
यावेळी परशुराम संघटनेचे सर्व पदाधिकारी, समाजबांधव व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हर्षद पांडव यांनी मानले .

Comments (0)
Add Comment