परभणी – ठाणे जिल्हा कबही असोसिएशन व विश्वास सामाजिक संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 72 वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेसाठी परभणी जिल्हा पुरुष व महिला संघ मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी रवाना झाले.
दिनांक 19 ते 23 मार्च दरम्यान संपन्न होणाऱ्या या स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघात (पुरुष) राहूल घांडगे (कर्णधार), रत्नेश्वर घांडगे, अंकुश भांडे, उद्देश बोचरे, भारत भिसे, विशाल ढवळे, प्रल्हाद कळसटकर , विजय तारे , वैभव कांबळे, सोहम वाव्हळ, युवराज शिंदे, स कृष्णा झटे तर प्रशिक्षक म्हणून प्रशांत नाईक तर संघ व्यवस्थापक म्हणून सुभाष मोहकरे , महिला संघात निकीता लंगोटे, शकुंतला बडे , गिता तुरे, गायत्री अवचार, संध्या पिंपळे , समिक्षा तुरे, आरती चव्हाण, श्रावणी कुलकर्णी , आल्फिया शेख, सोनिया शेख, कावेरी आढे, अलोनी मोटघरे प्रशिक्षक विलास राठोड तर संघ व्यवस्थापक म्हणून ज्ञानेश्वर ठोंबरे यांचा समावेश आहे. सर्व खेळाडूंना जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष सुरेशराव वरपुडकर , जिल्हासचिव तथा राज्य खजिनदार मंगल पांडे , प्रा डॉ माधवराव शेजुळ, प्रा डॉ चंद्रकांत सातपुते, चंद्रशेखर नावाडे ,गुलाब भिसे, प्राचार्य प्रकाश हारगावकर , प्रा नागेश कान्हेकर ,डी.डी. सोन्नेकर, प्रा डॉ के के कदम, दिलीपराव सुरवसे राज्यसचिव गणेश माळवे, सर्जेराव लहाणे ,माधव शिंदे, दत्तात्रय भिसे, प्रा डॉ ज्ञानेश्वर गिरी, किशन भिसे, भारत धनले, राजेश राठोड , किशोर भोसले , गोपाळ मोरे , ज्ञानेश्वर रेंगे , सौ संगिता खराबे, किशोर ढोके आदिंनी शुभेच्छा दिल्या