परभणीची ओळख उद्योगनगरी म्हणून करणार-आनंद भरोसे

परभणी,दि 16 ः
परभणी विधानसभा मतदारसंघात नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून त्यासाठी विधानसभेत पोहोचलो तर त्याला आणखी बळ मिळेल त्यामुळे भूमिपुत्र म्हणून साथ द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी केले.

आनंद भरोसे यांनी परभणी विधानसभा मतदारसंघातील पिंगळी,खानापुर आदी गावात भेटी दिल्या. या भेटीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.विविध गावात त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना  आनंद भरोसे म्हणाले परभणी मतदार संघामध्ये नवीन उद्योगधंदे नसल्यामुळे तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत आहे, परभणीतील औद्योगिक वसाहत बंद आहे. त्यामुळे नवीन औद्योगिक वसाहत उभारून त्या ठिकाणी किमान दहा हजार तरुणांना हाताला काम मिळेल अशी सोय करण्यात येणार आहे, विधानसभेत पोहोचल्यावर सर्वप्रथम परभणीला उद्योग कशाप्रकारे आणता येतील आणि उद्योग नगरी म्हणून परभणीची ओळख कशी निर्माण होईल यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे म्हणून सर्वांनी भूमिपुत्र या नात्याने मला साथ द्यावी असे आवाहन केले आहे. यावेळी अनेक तरुणांनी आनंद भरोसे यांना पाठिंबा दिला.

संपूर्ण कुटुंब प्रचारात
भरोसे यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारात आहेत. सौभाग्यवती सुचिताताई भरोसे या देखील शहरात विविध ठिकाणी महिला कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी घेत आहेत.तसेच चिरंजीव उदयनराजे हे देखील आपल्या तरुणाई सोबत प्रचारात उतरले आहेत.सौ.सुचीताताई या शहरात महिलांच्या भेटी  घेत महायुतीची ध्येय धोरणे समजावुन सांगत आहेत.तसेच उदयनराजे हे देखील तरुण वर्गासोबत विविध क्षेत्रातील नागरीकासोबत संवाद साधत आहेत.

Comments (0)
Add Comment