परभणी : परभणीची चिमुकली गोपाला फाऊंडेशनची सदस्य सांची संजय भोयर मोठ्या पडद्यावर झळकणार असून तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
येत्या २८ एप्रिल ला सिनेमागृहात प्रदर्शित होत असलेला संजय छाबरिया व बेला शिंदे निर्मित आणि अंकुश चौधरी यांची मुख्य भूमिका असलेला “महाराष्ट्र शाहीर “हा चित्रपट नरेश टॉकीज जिंतूर रोड परभणी या ठिकाणी लागणार आहे. या चित्रपटातून परभणी ची सांची भोयर महाराष्ट्र शाहीर चित्रपटा झळकणार आहे.
परभणीची चिमुकली सांची संजय भोयर अजय अतुल यांचे संगीत असलेल्या या चित्रपटात सांची भोयर ही बालकलाकाराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे या खेळण्याबागडण्याच्या वयामध्ये तिने घेतलेली उत्तुंग भरारी नक्कीच बालकासाठी प्रेरणादायी अशी आहे सांचीच्या या यशामुळे परभणीकरांची छाती अभिमानाने फुलून आली आहे सांची भोयर एक प्रकारे परभणीच्या शिरपेच्यातला मनाचा तुराच झाली आहे यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सांची च्या या यशाबद्दल गोपाल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. संतोष खराटे, पवनजी निकम, नाट्य कलावंत विनोद डावरे, सुधीर देऊळगांकर, साक्षी घोडेकर, बालाजी दामूके, त्रिंबक वाडस्कर, सुनील ढवळे, हरिभाऊ कदम,चकोर किंनगावकर,किरण डाके यांनी अभिनंदन
केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्या दिल्या.
सांची चे यश….
वयाच्या 4थ्या वर्षी पहिल्यावेळेस डान्स का दंगल ह्या डान्स शो मध्ये भोपाळ येथे गेली होती. त्या नंतर झी मराठी प्रस्तुत मन झालं बाजींद ह्या टीव्ही सिरीयल मध्ये काम केले तसेच 2022 मध्ये सातारा येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकपात्रि अभिनय स्पर्धेत महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळवला. अनेक ठिकाणी पारितोषिके मिळाले आहेत.आता नवीन कोरा मराठी चित्रपट महाराष्ट्राचा महामूवी ‘ महाराष्ट्र शाहीर ‘ ह्या चित्रपटात शाहीरांच्या छोट्या बहिनीची भूमिका केली आहे, केदार शिंदे दिग्दर्शीत सौ बेला शिंदे आणि संजय छाब्रिया निर्मित व अजय अतुल चे संगीत असलेला हा चित्रपट सांची साठी मोठी संधी आहे.