निफाड / रामभाऊ आवारे – नाशिक भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय यांच्या वतीने निफाड तालुकास्तरीय ‘संघनायक मेळावा’ नुकताच पिंपळगाव हायस्कूल,पिंपळगाव, ता.निफाड येथे नुकताच संपन्न झाला. अतिशय अभिनव अशा या उपक्रमात वनसगाव विद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटील पथकाचे १० स्काऊटस् व सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील गाईड पथकाच्या ९ गाईडस् यांनी प्राचार्य सी.डी.रोटे, पर्यवेक्षक के.बी.दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊटर दिपक गायकवाड यांच्यासह सहभाग घेतलेला होता. संघनायक शिबिराचे उद्घाटन पिंपळगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सर्वप्रथम स्काऊट ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.बाचकर सर, नाशिक जिल्हा स्काऊट संघटक श्रीनिवास मुरकुटे, संघनायक मेळावा शिबिर प्रमुख बद्रीनाथ रायते, एन.डी.एस.टी संचालक समीर जाधव यांच्यासह तालुक्यातील विद्यालयांचे मार्गदर्शक स्काऊटर- गाईडर व विद्यार्थी उपस्थित होते .प्रास्ताविकातून नाशिक जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे यांनी मेळाव्याचा उद्देश विशद केला .मुख्याध्यापक एस बी जाधव व समीर जाधव यांनी आपल्या मनोगतांतून सदर उपक्रमाचे कौतुक करताना आदर्श नागरिक घडण्यासाठी स्काऊट गाईड चळवळीचे जीवनात अतिशय महत्त्व असल्याचे गौरवोदर का ओढले. वनसगाव विद्यालयाचे स्काऊट प्रशिक्षक दिपक गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संघनायक मेळाव्यात जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे यांनी विविध कृतीगीते सादर करतांना स्काऊट गाईड च्या आदर्श जीवनमूल्यांविषयी माहिती दिली.
मेळावा शिबीरप्रमुख बद्रीनाथ रायते यांनी स्काऊट-गाईड चळवळीचा इतिहास व महत्त्व ,गाठीचे प्रकार, विविध गॅजेट्स,स्ट्रेचर,संघपद्धती यांविषयी तर स्काऊट मास्टर बाजीराव वाघ यांनी स्काऊट गाईडचे नियम यांच्या विषयी माहिती दिली. दिपक गायकवाड यांनी स्काऊट- गाईडचे वचन, ध्येय ,प्रार्थना ,झंडा गीत याविषयीची माहिती दिली. स्काऊट गाईड कार्यालयाच्या वतीने अतिशय सुबक अशा प्रमाणपत्रांचे शिबिरार्थींना वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम कृतींमध्ये सहभाग घेत आनंद लुटला.