सेलूत सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत तरुण कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

सेलू / प्रतिनिधी – कोणतेही पद नसताना सामान्यांच्या हितासाठी काम करत राहाणारा नेता म्हणून सुरेश नागरे यांची चर्चा संपुर्ण जिंतूर – सेलू तालुक्यात आहे. या युवा दमदार नेतृत्वाला साथ देण्यासाठी सेलूच्या शिवाजीनगर येथील इतर पक्षाच्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी नागरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

 

यामध्ये शिवाजीनगर येथील लक्ष्मण दौड , आबा यादव, चेतन राजूलवार, बाबा डोंबाळे, आश्विन सासोडे, राजू सासोडे, गणेश इंगळे, गणेश खाटीकमारे , गंगाराम सरकाळे, विलास इंगळे, शिवाजी सोनटक्के, अफरोज पठाण, अक्षय इंगळे, राजू सरकाळे, बालू डोंबाळे, अमित जाधव, अरुण इंगळे, शिरू नाना कोठले, बबलू खरात, दत्ता तांबट, अक्षय सोळंके, अमित जाधव, साजिद लाला, कलीम भाई, इम्रान भाई गुत्तेदार, अबरार भाई, अरुण उपाडे आदींचा समावेश आहे.

तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी काम करणाऱ्या श्री.सुरेश नागरे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अमृता नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महिलांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, तालुकाध्यक्ष प्रसादराव बुधवंत, तालुका अध्यक्ष बाळासाहेब जोगदंड,शहर अध्यक्ष रहीम सर, कमलताई लोखंडे, अनंतराव कोरडे, माजी समाज कल्याण सभापती लिंबाजीराव पुजारे गुरुजी ,खयुम कादरी इस्माईल शेख, राजेंद्र नागरे, प्रकाश रोडगे, माणिक हिंगे, विठ्ठल डक, ऋषी अंभोरे, तहसीन देशमुख, गजानन घुगे, विष्णुपंत सोळंके, बाळासाहेब हजारे, विष्णू देवकते आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment