पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पेट्रोलचा दर 9.50 पैसे आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहे. करोनाचं संकट, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध यामुळं निर्माण झालेली स्थिती, महागाईचा फटका यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं कर कमी केले आहेत. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी देखील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय १२ सिलेंडरवर २०० रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं देखील निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. यामुळं केंद्र सरकारला ६ हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कमी केले नव्हते.

Comments (0)
Add Comment