सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हातनूर येथे वृक्षारोपण

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचा अभिनव उपक्रम

 

 

सेलू / नारायण पाटील – मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथील आर्य वैश्य महासभेच्या वतीने तालुक्यातील हतनूर येथील श्री नागनाथ मंदिर आणि जि.प. शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

 

या कार्यक्रमास महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री माधवअण्णा लोकूलवार, जिल्हा सहसचिव श्री मोहन कोत्तावार सर, हतनूर चे सरपंच श्री महेंद्र गाढे, जयशिंग शेळके, मंदिर संस्थानचेअध्यक्ष श्री बालासाहेब आंधळे, मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभिजित राजूरकर, श्री लक्ष्मण बोराडे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय राठोड तसेच सर्वशिक्षक,गावकरी मंडळी ,महासभेचे पदाधिकारी , समाजबांधव ,समाजभगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर फुटाणे यांनी केले.

Comments (0)
Add Comment