अ.भा साहित्य संमेलनात कवि पांडुरंग वागतकर सादर करणार कविता

 

परभणी,दि 19 
सरहद  पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या साहित्य संमेलनासाठी कवीकट्टा या काव्य मंचावर कविता सादर करण्यासाठी परभणीतील कवी पांडुरंग वागतकर यांची निवड झाली आहे.

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा सरहद पुणे या संस्थेला मिळाला आहे. हे संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये होणार आहे,या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कवीकट्टा या काव्य मंचासाठी मूळचे भोकर येथे असलेले पांडुरंग वागतकर यांच्या करपलेली घोळ या कवितेची निवड झाली आहे, यासाठी त्यांना साहित्य संमेलन कडून कविता सादर करण्याचे निमंत्रण मिळाले आहे,22 फेब्रुवारीला सायंकाळी सहा ते सात या वेळेत कविता सादर होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षा प्रा. उषा तांबे,सदस्य राजन लाखे, समन्वयक गोपाळ कांबळे, डॉ. मनोज वराडे यांनी हे पत्र पाठवले आहे.

 

Comments (0)
Add Comment