आष्टी: परतूर प्रतिनिधी गोपाल पोटे
मुलीमधून गावात पहिल्यांदाच एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रतिभा शिवहरी पोटे हिचा रायगव्हाण(ता.परतूर)येथे ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार नुकताच करण्यात आला.अध्यक्षस्थानी सरपंच परमेश्वर केकान हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात,वैदकिय अधिकारी डॉ.रबडे,डॉ.जनार्धन बरसाले,डॉ.मारोती वाघमारे,सिध्देश्वर सोळंके,डॉ.विलास तोंडे, रवी सोळंके आदीची उपस्थिती होती. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने डॉ.प्रतिभा पोटेचा शाल श्रीफळ, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले.यावेळी चंद्रकांत महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांनी प्रतिभाचे कौतुक केले.
ग्रामीण भागातून प्रतिभा पोटे हिने एमबीबीएस पदवी प्राप्त कल्याने तिचे जितके कौतुक करू तितके ते कमीच. तिच्या यशात आई, वडील व गुरूंचा वाटा आहे हे विसरू नकोस असा सल्ला देत.एक दिवस नक्की प्रगती करशील आणि नामांकित डॉक्टर बनण्याचं स्वप्न लवकर पूर्ण करशील याची खात्री आहे. अशीच प्रगती करत रहा आणि वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी हो असा सल्ला देत चंद्रकांत महाराज यांनी
प्रतिभास शुभेच्छा दिल्या.तसेच ऋतुज विक्रम पोटेचाही बी ए एम एस ला प्रवेश मिळाल्याबद्दल तिच सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉ.हिरकणी खेत्रे,डॉ.आरती मैंद,महादेव वाघमारे, गंगाधर सोळंके, आशा वाघमारे,शिवाजी पोटे, सिध्देश्वर केकान, शिवदास पोटे, बालासाहेब पोटे, सुरेश पोटे, गंगाराम पोटे, मुंजाभाऊ पोटे,दादाराव नवल,राजाभाऊ पोटे, वाल्मिक पोटे, ज्ञानोबा पोटे,मुरलीधर केकान,नवनाथ नवल, सतिश पोटे, रत्नदीप पोटे, किशोर पोटे,गोपाल पोटे सुनील केंद्रे, राजू केकान यांची उपस्थिती होती.सुत्रसंचालन मोहन सोळंके यांनी तर भागवत पोटे यांनी आभार मानले.
फोटो:-रायगव्हाण येथे प्रतिभा पोटेचा नागरी सत्कार