नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांची आमदार नितेश राणेंकडे देवगडमध्ये सुसज्ज नाट्यगृह उभारण्याची मागणी

'प्रेम करावं पण जपून' नाटकाच्या प्रयोगादरम्यान दिग्दर्शकाने असुविधांकडे वेधले होते लक्ष

देवगड येथील सांस्कृतिक कलाभवनात ‘प्रेम करावं पण जपून’ नाटकाचा ५३ वा प्रयोग संपन्न

(प्रतिनिधी) – मधुसंगीता थिएटर्स व अर्चना थिएटर निर्मित ‘प्रेम करावं पण जपून’ या नाटकाचा ५३ वा प्रयोग देवगड जामसंडे शहराच्या नगरसेविका श्रीमती. तन्वी चांदोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कलाभवन देवगड येथे दिमाखात पार पडला.

नाटकाला तेथील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सांस्कृतिक कलाभवनातील काही समस्या व त्रुटी नाटकाचे दिग्दर्शक आणि अभिनेता विशाल असगणकर यांनी नगरसेविका श्रीमती तन्वी चांदोस्कर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच सुधारित सेवा देण्यात याव्या अशी विनंती केली. नगरसेविका श्रीमती तन्वी चांदोस्कर यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत आमदार नितेश राणे यांना देवगड जामसंडे शहरात महाराष्ट्र शासनातर्फे सुसज्ज नाट्यगृह उभारण्याबाबत निवेदन पत्र दिले.

त्या निवेदनात म्हटले आहे की देवगड तालुक्याला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक गुणवंत कलाकार देवगड तालुक्यात असून या सर्व कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी व बाहेरील सर्व व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना येथे आपली कला सादर करता यावी म्हणून देवगड शहरामध्ये आपल्या स्तरावर महाराष्ट्र शासनातर्फे सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्यात यावे. जेणेकरून देवगड व आजूबाजूच्या गावामधील सर्व नाट्य रसिकांना आणि कलाकारांना नाटकाचा आनंद घेता येईल.

 

आमदारदुरवस्थादेवगडनाटकनाट्यगृहनितेशप्रयोगप्रेम करावं पण जपूनमागणीराणेसुधारणा
Comments (0)
Add Comment